Skip to main content

पावसाचे रंग!!!!! Bombay rain Mgd-official by (Manish chandurkar)!!!

        पावसाचे रंग!!!!! Bombay rain

   (Mgd-official) -

 by Manish chandurkar

(पावसाचे रंग) मराठी ब्लॉग!!! 

             "मुंबईकर कधीही विसरू शकणार", 

      मुंबईचे che पावसाळी रौद्र रूप 

(Mgd-official) presents :-

(मनीष चांदूरकर) 

  Mgd-official  ! ! !

       

  http://mgdcontruction.blogspot.com/2018/07/mgdofficial.html?m=1

 असा तो अनुभव आजही विसरू न शकणाऱ्या एकाचे हे मनोगत-मुंबईकरांच्या आयुष्यात २६ जुलै २००५ हा एक काळाकुट्ट दिवस प्रत्येक कायमचा लक्षात राहील. या घटनेस आता दहा वर्षे झालीत. परंतु घडलेल्या घटना मनात खूप खोलवर रुजलेल्या आहेत. तसेच या घटनांची दर वर्षीच्या पावसाळ्यात आठवण होत असल्याने त्या आठवणी ताज्याच आहे असेच वाटते.त्या दिवशी मी मुंबईतील बीकेसी येथील माझ्या मुख्य कार्यालयात काम करीत होतो. संध्याकाळची ती चारची वेळ असावी. बाहेर एक पावसाची मोठी सर येऊन गेली होती. तरीही बाहेर काळाकुट्ट अंधार दिसून येत होता. आभाळ भरून आले होते. आणखी मोठा पाऊस येण्याची चिन्हे दिसत होती. पूर्वानुभवाने खूप मोठा पाऊस येण्याची दाट शक्यता असल्याने आम्ही सर्व जण पूर्वपरवानगीने ऑफिसमधून घरी जावयास बाहेर पडलो. जणू आम्हास पूर्वसंकटाची जाणीवच झाली होती.मी, माझे दोन वरिष्ठ मित्र असे आम्ही तिघे ऑफिसच्या बाहेर पडलो. आमच्यासारखाच इतर ऑफिसेसमधील स्टाफही त्वरेने घराकडे निघाला होता. बाहेर पाऊस येतच होता. नेहमीप्रमाणे आम्ही तिघे मारुती कारमध्ये बसून जोगेश्वरी-गोरेगावच्या दिशेने निघालो. पावसाच्या भीतीने बरेच जण एकदम निघाल्याने रस्त्यावर गर्दी झाली होती. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई झाली होती. रस्त्यावर सुमारे गुडघ्याच्या वर पाणी साचले होते. आमचा मार्ग मुंबईच्या मिठी नदीच्या पुलावरूनच जात होता. नदीलाही पाणी आले होते. तिच्याकडे भययुक्त कटाक्ष टाकून गाडीचा वेग वाढविला गेला. आम्ही कलानगर मागे टाकून बांद्रा पुलाखालून स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलो. आता सुमारे पाच वाजले होते. ट्राफिक जाम व्हायला सुरुवात झाली होती. गर्दीमुळे आमच्या गाडीचा वेग कमी झाला होता. पुढील गाडय़ा अगदीच मंदगतीने पुढे सरकत होत्या. 
       www.rainynagpur.blogpost.com

आम्ही एका तासात फक्त शंभर मीटरच पुढे सरकलो असू. आम्हास अंदाज आला की आता गाडय़ा पुढे जाणारच नाहीत, तरी पण मोठय़ा आशेने आम्ही गाडीतच बाहेरील पावसाची रिपरिप पाहत बसलो. पावसाचा वेग वाढला होता. बाहेर सगळीकडे गाडय़ा आणि पायी जाणारी माणसे यांची गर्दी वाढू लागली होती. त्याचबरोबर पाण्याची पातळीही वाढत होती. पाऊस बंद होईल आणि पाणी ओसरेल या आशेने आम्ही गाडीतच वरुण राजाचा वर्षांव थांबेल याची वाट पाहत बसलो. पावसाचा वेग आणि पाण्याची पातळी वाढणे थांबण्याचे लक्षण दिसत नव्हते. एकदा आम्ही गाडीबाहेर नजर टाकली. गाडीची चाके पूर्ण बुडाली होती आणि पावसाचा वेगही आणखी वाढला होता. गाडय़ा पुढे जाण्याचे थांबले होते. आम्ही तिघांनी पाऊस थांबायचे चिन्ह दिसत नसल्याने आणि पाणी वाढतच असल्याने गाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आमच्या गाडीमागे इतर गाडय़ांची मोठी रीघ लागली होती. बरेच जण आपल्या गाडय़ा जागीच सोडून गाडीतून बाहेर पडले होते. गाडी आणि गाडीच्या काचा बंद करून आम्ही गाडीबाहेर पडलो. बाहेर बघतो तर काय आमच्या गुडघ्यापेक्षा जास्त असे पाणी रस्त्यावर साचले होते. आता संध्याकाळचे सात वाजले असावेत. बाहेर इतर गाडय़ांचा हॉर्न, सोसाटय़ाचा वारा आणि धो-धो पडणारा पाऊस यांचा एकत्र विचित्र भयानक असा आवाज येत होता. अशा परिस्थितीतही मुंबईकर एकमेकांना मार्गदर्शन करताना दिसले. ‘इकडून जा. तिकडून जाऊ नका. पुढे खड्डा आहे. तिकडे खूप पाणी वाढले आहे.’ अशा प्रकारच्या सूचना देत होते. अजून पाऊस जोरात येतच होता. सकाळी घरून निघताना पावसाचा अंदाजच नसल्याने आम्ही छत्र्या घेतल्या नव्हत्या. त्यामुळे तुफान पावसात भिजतच आम्ही निवाऱ्यासाठी जागा पाहू लागलो. महत्प्रयासाने आणि खूप शोधाअंती योगायोगाने आम्हांस जेथे गाडी उभी केली होती, त्या जवळच बांद्रा पुलाखाली पिलरच्या फौंडेशनची जागा दिसली. आम्ही वेळ न दवडता त्यावर एकमेकांच्या सहकार्याने चढलो. तेथेच आमच्या आधीच काही मंडळी जागा पटकावून बसली होती. आम्हांस एका कोपऱ्यात काही समदु:खी मुंबईकरांनी जागा करून दिली. मला त्या वेळी मुंबई- लोकलमधील आठवण आली. तीन सीटच्या बेंचवर मुंबईकर चौथ्यास कसा सामावून घेतो हे आठवले.वरुण राजाचा वेग काही कमी होत नव्हता. त्याने आता मुसळधार असे स्वरूप धारण केले होते. तो धो-धो पडतच होता. वीज मंडळाने असहकार पुकारल्याने सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरला होता, परंतु याउलट काही गाडीवाल्यांनी सहकाराच्या भावनेतून गाडय़ांची बॅटरी डाऊन होईल की नाही याची पर्वा न करता आपल्या गाडय़ांचे दिवे इतरांच्या मार्गदर्शनासाठी आणि प्रकाशासाठी चालूच ठेवले होते. आम्ही चढलेल्या ओटय़ावर आम्हाला एक बाय एकचा एक दगड दिसला. ‘तुम्ही बसा. अहो, तुम्ही बसा’ असे म्हणत आम्ही त्या एकमेव दगडावर आळीपाळीने स्थानापन्न व्हायचे ठरविले. 

       रौद्र रूप धारण केलेला वरुण राजा तो शांत होण्याची वाट पाहत त्या दगडावर एक एक करून बसलो. आमच्याकडील मोबाइल डिस्चार्ज झाले, काहींची रेंजही गेली होती. आमचा घराच्यांशी संपर्क तुटला होता. प्रत्येक क्षणाची माहिती देणे आणि घेणे बंद झाले होते. घरच्यांची आणि आमची काळजी वाढत होती. सर्व काही ठप्प झाले होते. फक्त वेळ जात होती. ती जाण्याचा वेगही कमी झाला असे वाटत होते. पाऊस अद्यापही चालूच होता. आता गाडय़ांच्या बॅटरीज संपल्याने त्यांचे दिवेही बंद झाले होते. सगळीकडे काळाकुट्ट अंधार असल्याने आम्हांला धो-धो पडणाऱ्या मुसळधार पावसाची फक्त जाणीव होत होती. आमच्या गप्पा संपल्या होत्या. सगळे मोठय़ा आशेने पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. अंधारात चहू बाजूला काय चालू आहे, याचा अंदाज येणेही बंद झाले होते. आम्हांलाही आलटूनपालटून त्या एका दगडावर बसून अक्षरश: कंटाळा आला होता. जागीच आम्ही पाय मोकळे करीत होतो. तशाच अवस्थेत उभ्या उभ्याच निद्राराणी आमच्यावर अंमल करू पाहत होती. काही वेळा तर आम्हाला चक्कर आल्यासारखे झाले होते, पण खाली पाण्यात झोक जाईल, या भीतीने आम्ही एकमेकांस जागे ठेवत होतो. असे करता करता पहाटेचे पाच वाजले. आता उजाडेल, मग उजाडेल आणि आपणास सगळीकडे काय चालू आहे हे समजेल. या आशेने दिवस उजाडण्याची वाट पाहत बसलो. सकाळ झाली. सगळीकडे पुसटसा उजेड पडू लागला. त्या उजेडात आम्ही बघतो तर काय चहूकडे पाणीच पाणी दिसून येत होते. पाऊस अजूनही चालूच होता. पण वेग बराच कमी झाला होता. पाण्याने आमचा फौंडेशनचा पिलर वेढला होता, ओटय़ाच्या वरच्या टोकापर्यंत पाणी पोहोचले होते. ज्याला जिथे जागा मिळेल तेथे ते आडोशाला थांबलेले आढळले.आजूबाजूला काही पूर्ण तर काही अध्र्या गाडय़ा बुडालेल्या दिसत होत्या. 
                        







 पावसाच्या पाण्याने लहान-मोठा भेदभाव केला नव्हता. त्याने बसेस आणि डबल डेकरचाही अपवाद केला नव्हता. आम्हांला उजेडात आमची पाण्यात बुडालेली गाडी दिसली. ती तिच्या रंगावरून ओळखू आली. आता पाऊस जवळजवळ थांबला होता. पाणी किंचित ओसरू लागले होते. काही जण हिंमत करून पाण्यातून चालताना दिसत होते. तेवढय़ात आम्हांस थोडय़ा अंतरावर एक ग्रुप एखाद्या मुंग्यांच्या रांगेसारखा पाण्यातून वाट काढत येताना दिसला. ती रांग वाढत होती. तिचा शेवट एका बसच्या दरवाजातून दिसत होता. याचा अर्थ ते सर्व बसमधील प्रवासी होते आणि ते रात्रभर त्या बसमध्ये बसून होते. त्यात अनेक महिला, तरुण, वृद्ध असे सर्व गटांतील लोक होते. ती पाण्यातून शिस्तीत एकमेकांना सावरत आधार देत चालत असलेली रांग आम्हांस स्फूर्ती ठरली आणि आपणही पाण्यात उतरून घरी निघावे असे वाटले. आमची मात्र हिंमत होत नव्हती. ओटय़ावरील काही जण हिंमत करून पाण्यात उतरून जाऊही लागले.आता सकाळचे आठ वाजले असतील. माझे वरिष्ठ मित्र सर्व जण पाण्यात उतरून निघावे, अशा विचारात होते. मी नाही म्हणाल्याने त्यांचाही पाय निघत नव्हता. मला पोहता येत नाही, असे मी त्यांना सांगितले. तेही म्हणाले, ‘‘आम्हांलाही पोहता येत नाही, तरी पण आता आपण जाऊ या.’’ इकडे ओटय़ाखाली एखादा फूट पाणी ओसरले असेल. ते दोघे माझ्यासाठी माझ्या निघण्याची वाट पाहत माझ्याबरोबरच थांबले आहेत, या विचाराने मीही त्यांच्याबरोबर पाण्यात उतरण्याचे ठरविले आणि त्यांच्याबरोबर कसाबसा एकमेकांना सावरत पाण्यात उतरलो. पाणी अगदी माझ्या गळ्यापर्यंत लागले होते. मुंबईकर एकमेकांच्या साथीने, एकमेकांना सावरत, मार्गदर्शन करीत पाण्यातून मार्ग काढून जात होते. मी आणि माझे वरिष्ठ मित्र एकमेकांना धरून चालत होतो. ते दोघे माझ्यापेक्षा थोडे उंच होते. आम्ही एकमेकांचे हात घट्ट धरून पाण्यातून मार्ग काढीत होतो. मनात देवाचा धावा करीत जात मार्गक्रमण करीत असल्याने भीतीची तीव्रता कमी झाली होती. ‘पुढे खड्डा आहे, त्या बाजूला जाऊ नका’, ‘तिकडे खड्डा आहे, तिकडे जाऊ नका’, ‘तिकडे नाला, गटार आहे, एक जण त्यात बुडता बुडता वाचला.’’ अशा सूचना ऐकत, त्या पाळत मी माझ्या गळ्याइतक्या पाण्यातून मार्गक्रमण करीत होतो. आजूबाजूला सोसायटय़ा बुडालेल्या दिसत होत्या, लोकांच्या घरात पाणी शिरलेले दिसत होते, काही जण आसरा म्हणून घराच्या छपरावर, जिथे जागा मिळेल तेथे सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत इतरांना मार्गदर्शन करीत होते, मदत करण्याची धडपड चालू होती. अशा कठीण परिस्थितीतही त्यांच्या कृतीचे कौतुक वाटत होते. पाणी अगदी घाण होते, त्याचा खूप घाण वास येत होता. वाटत होते अख्ख्या मुंबईची घाण मिठीमार्गे त्या पाण्यातून वाहत होती. कलानगरचा बराचसा भाग पाण्यात बुडाला होता. काही जण छोटय़ा छोटय़ा बोटीतून पूरग्रस्तांना आश्रय देत त्यांना बाहेर काढीत होते. कोणी म्हणत होते, ‘‘अरे, मी एका सेलिब्रेटीला पाण्यातून मार्ग काढताना पाहिले.’’ मुंबईकर सर्व जात-धर्म विसरून एकमेकांना पाण्यातून वाचवण्यासाठी सहकार्य करीत होता.
https://affiliatemarketingplatform.blogspot.com/2018/06/affiliate-marketing-platform-there-are.html?m=1   
  पाण्यातून चालत असताना ‘‘अरे, तो एकाला वाचवायला गेला आणि तोच बुडाला.’’ असेही ऐकू आले, पण असे सांगताना इतरांवरील मदतीचा ओघ कमी होत नव्हता. मला तर गळय़ाइतक्या पाण्यातून वाट काढताना पाण्यात डुंबत, पोहत असलेल्या जनावरांची आठवण झाली. माझीही जवळजवळ तशीच परिस्थिती झाली होती.मी तर अक्षरश: पायाच्या टाचा उंच उंच करीत पाण्यातून वाट काढीत, माझा प्राण वाचविण्याचा प्रयत्न करीत, रांगेत चालत होतो. मला आठवते की मी तीन ते चार वेळा पाण्यात धडपडून पडत असताना वाचलो होतो. पाण्यातून जात असताना पायाशी थोडीही वळवळ जाणवली की, काय वळवळ करीत असेल बरे? अशा भीतीने अंगावर काटा येत होता आणि देव आठवत होता. मुंबईकरांचे धैर्य बघून त्यांच्याकडून स्फूर्ती घेत आम्ही सांताक्रूझच्या पुलावर पोहोचलो. तेथील पुलाखाली गुडघ्याइतके पाणी होते. पुलावरून इकडेतिकडे पाहिले आणि मी चक्रावलो. Paण्यात गाडय़ा बुडालेल्या दिसत होत्या, काही गाडय़ांच्या काचांमधून पाहिले तर आतील माणसे झोपल्यासारखी दिसली. नंतर या संदर्भात दुसऱ्या दिवशी बातम्या वाचताना कळले की गाडीत पाणी शिरू नये म्हणून त्यांनी काचा लावलेल्या होत्या. त्या गाडय़ा पाण्यात बुडाल्याने गाडीतील व्यक्तींचा गुदमरून मृत्यू झाला होता. गाडीच्या लोभापायी अथवा गाडीतच बसून सुरक्षित वाटत असल्याने त्यांनी आपला मृत्यू ओढवून घेतला होता. हे वाचून माझ्या मनाला काय जाणवले हे शब्दात सांगता येत नव्हते. पुढे पुढे मार्गक्रमण करीत असताना इतरत्र घरांमध्ये पाणी घुसलेले दिसत होते. अनेक गाई-म्हशी, कुत्रे-मांजर पाण्यात मरून पडलेले दिसले. मृत जनावरांचे देह इकडे तिकडे पसरलेले दिसले. अंगाला काटा, शिसारी आली. जिवंत राहिलेले आपला प्राण वाचवण्यासाठी धडपडत होते, त्यात छोटे उंदीरही दिसले. काही जनावरे जिवाच्या आकांताने ओरडत होते. निसर्गाने आपले रौद्र रूप दाखविले होते. मी तसाच आजूबाजूला पाहत जात होतो. झोपडपट्टीतील लोकांचे हाल, जनावरांचे गोठे पाहून मन विषण्ण होत होते. वीज नसल्याने सर्व पेट्रोलपंप बंद होते. त्यामुळे रिक्षा वगैरे बंद होत्या. आम्हास पायीच चालावे लागले. माझ्या वरिष्ठ मित्राचा निवास आल्याने ते आपल्या मार्गाने घरी गेले. जाण्यापूर्वी त्यांनी मला त्यांच्या घरी येण्याचा आग्रह केला, परंतु माझे कपडे खूप खराब झाले होते. कपडय़ांचा घाण वास येत होता. माझा अवतार विचित्र झाला होता. रूमवर जाऊन कधी एकदाची अंघोळ करीन असे झाले होते. मी त्यांचा निरोप घेऊन गोरेगावकडे निघालो. आता सकाळचे नऊ वाजले होते. मी बघितले ठिकठिकाणी मदतीचे स्टॉल उघडले होते. पूरग्रस्तांना चहा, बिस्किट, फळे वाटली जात होती. 
             



एका ठिकाणी आयुष्यात प्रथमच पूरग्रस्तांसाठीचा चहा आणि बिस्किट घ्यावे लागले. कारण काल दुपारपासून पोटात अन्नाचा एक कणही गेला नव्हता.मी तसाच रूमवर गेलो. वीज गेली असल्याने पाण्याच्या टाकीतील पाणी वापरामुळे संपले होते. नळाचे पाणीही गेले होते. आता काय करायचे, असा प्रश्न पडलेला असतानाच बाथरूममध्ये डोकावलो, तिथे बादल्या भरून ठेवलेल्या आढळल्या. त्यातील एका बादलीतील गार पाण्याने कशीबशी अंघोळ केली. माझ्या इतर सहकाऱ्यांना पाणी मिळावे म्हणून मी एकाच बादलीत भागविले होते. अंघोळीनंतर खूप बरे वाटले. एव्हाना माझे काही रूम सहकारीही आले होते. त्यातील एका सहकाऱ्याने सर्वासाठी चार-पाच डझन केळी, दहा-बारा बिस्किटाचे पुडे आणले होते. ते खाऊन भूक भागवली. मला समजले पाण्याच्या बादल्याही आमच्यापैकी एका सहकाऱ्याने आधीच भरून ठेवल्या होत्या. वीज गेल्याने नंतर हे पाणीही मिळाले नसते. समजा, हे काहीच नसते तर? हे आठवून त्या सहकाऱ्यास मनोमन धन्यवाद दिले आणि कृतज्ञता व्यक्त केली.माझे घरचे खूप काळजी करीत असतील, असे वाटून मी लगेच पुण्यास मिळेल त्या बसने निघालो. त्यांनी टी.व्ही.वर बातम्यांमध्ये सगळे पाहिले होते. त्यांना खूपच चिंता वाटत होती. सर्व जण माझी मोठय़ा आतुरतेने वाट पाहत होते.
:- (by Manish Chandurkar)


Comments